साखर कारखानदारांसमोर अनेक यक्षप्रश्न
राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा एकूण १८७ साखर कारखान्यांपैकी ४२ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. दि. २६ मार्चपर्यंत राज्यात ८ कोटी ८९ लाख ४७ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून त्यापासून ९ कोटी ९० लाख ३३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा साखर उतारा ११. १३ असा आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे विभागात झाले असून ६१ कारखान्यांनी ३ कोटी ८८ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सर्वात कमी साखर उत्पादन नागपूर विभागाचे झाले आहे. तेथील ४ साखर कारखान्यांनी ४ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी याच तारखेला १४९ साखर कारखाने बंद झाले होते. उसाच्या कमतरतेमुळे साखरेचे उत्पादन अवघे ४ कोटी १७ लाख ९६ हजार क्विंटल झाले होते.
