Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांची दबंगगिरी आणि पत्रकारांनी केला निषेध!


जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी प्रवरानदी पात्रात जाऊन वाळू तस्करावर कारवाई सुरु केल्याची माहिती मिळताच काही पत्रकार या नदीपात्रात पोहोचले. या पत्रकारांनी कारवाईचे मोबाईलमधे फोटो घेतले. मात्र फोटो घेत असतांना जिल्हाधिकारी महाजन यांनी फोटो घेऊ नका. आम्ही गेल्यावर नदीचे फोटो घ्या. कारवाई करतांनाचे फोटो हवेत, असे पत्रकारांनी सांगितले असता जिल्हाधिकारी महाजन यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला आणि कारवाईचे फोटो डिलिट केले. एकीकडे मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्री कामे करतांना ‘सेल्फी’ काढतात. मात्र जिल्हाधिकारी महाजन यांना यात कोणती बाब खटकली, असा सवाल उपस्थित करीत उपस्थित पत्रकारांनी जिल्हाधिकारी महाजन यांच्या या वर्तणुकीप्रकरणी निषेध नोंदविला.