संजय कोळसे यांची सहयोगी प्राध्यापकपदी निवड
महात्मा फुले कृषी विद्यापीठ समन्वयीत ‘फळपिके योजना’ येथे कार्यरत असलेले वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे यांची वनस्पती रोगशास्त्रज्ञ विभागामध्ये सहयोगी प्राध्यापकपदी निवड झाली. डॉ. कोळसे यांचे उच्च शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विध्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झाले. त्यांनी आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये विद्यापिठाच्या मोठया प्रमाणावर बिजोत्पादनाच्या कार्यक्रमात तसेच फळपिकांच्या वनस्पती रोगशास्त्रविषयक संशोधनामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.
विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी वितरित केलेल्या संशोधन १४ शिफारशीमध्ये डॉ. कोळसे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, या निवडीबद्दल डॉ. कोळसे यांचे सर्व फळबाग शेतकरी, मित्रमंडळ व अधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे. इंजिनिर दिलीप शिरसाठ, शिवाजी तनपुरे, गोरख गायकवाड, संदीप आहोळ, गोरख देशमुख, अनिल शिंदे यांनी या निवडीबद्दल डॉ. कोळसे यांचा सत्कार केला.