Breaking News

प्रयोगवनच्या वतीने ठाण्यातील महिला पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रयोगवन परिवार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्तार शेख यांच्यावतीने जामखेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या जामखेड पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेल्या महिला हेड काँस्टेबल शबनम शेख, महिला पोलीस काँस्टेबल राणी व्यवहारे, महिला पोलीस काँस्टेबल रूक्मिणी तिडके, महिला पोलीस काँस्टेबल अंजु सानप, महिला पोलीस काँस्टेबल सोनाली जाधव, महिला पोलीस काँस्टेबल यशोदा काळे, महिला पोलीस काँस्टेबल अनिता निकत, महिला पोलीस काँस्टेबल अनुराधा घोगरे या महिला कर्मचार्‍यांचा यथोचित सम्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक पोकळे, जामखेड वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल डोके, पत्रकार यासीन शेख, पो. कॅा. शामसुंदर जाधव, पो. कॉ. बाबासाहेब बडे, पो. कॉ. अमोल लोखंडे सह आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रयोगवनच्या वतीने पोलीस कर्मचार्‍यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रयोगवनचे अध्यक्ष सत्तार शेख यांनी केले. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस दलाचे सामान्य जनतेशी असलेल्या नात्याला अतुट करण्याबरोबरच पोलीस दलात कार्यरत असलेल्या, मोठ्या धैर्याने विविध अडचणींना तोंड देत आपले कर्तव्य तत्परतेने बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांना काम करण्यास बळ मिळावे याकरिता जामखेड येथील प्रयोगवन परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जामखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आले.