Breaking News

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : त्यागींसह 10 जणांवर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्ली उच्च न्यायालयात आज माजी हवाईदल प्रमुख सतीश  त्यागी व अन्य 9 जणांवर आरोपपत्र दाखल केले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्या. अरविंद कुमार यांच्यासमोर दाखल केले. या आरोपपत्रात  450 कोटी रुपयांच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी त्यागी यांचे नातेवाईक संजीव उर्फ जुली व वकील गौतम खैतान यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला  आहे.
खैतान यांनी देशभरातील विविध कार्यालयांपर्यंत पैसे पोचवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली होती, असा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. 12 हेलिकॉप्टर  खरेदीत झालेल्या घोटाळा प्रकरणी 9 डिसेंबर 2016 रोजी त्यागी यांच्यासह संजीव त्यागी वी खैतान यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली होती. नंतर 26  डिसेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयाने त्यागी यांना जामीन मंजूर केला.