Breaking News

नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, एका जवानाला हौतात्म्य

गुवाहाटी, दि. 07 - ईशान्य भारतातील नागालँडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले असून एका जवानाला  हौतात्म्य आले आहे. या चकमकीदरम्यान तीन जवान जखमी झाले असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू झालेली चकमक अद्याप सुरू असल्याचे वृत्त आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवादी कारवाया वाढल्या  असल्यामुळे सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काल सीमा सुरक्षा दलाच्या काश्मीरमधील एका तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या  हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आले.