उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची संस्कृती संगीतमैफलीतून अवतरणार
मुंबई - वाराणसी शहरामधील ऐतिहासिक दशवशमेध आणि राजेंद्र घाटावर महाराष्ट्रातील अभंग आणि उत्तर प्रदेशमधील ठुमरी, बिरहा आणि इतर भक्तिरसपूर्ण गाण्यांचा संगम ऐक ायला मिळणार आहे. हर हर गंगे कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व असून ते यावेळी अधिक मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आले आहे. मुंबई येथील माध्यम या सांस्कृतिक संस्थेने येत्या 18 मार्चला ही संगीतमैफल आयोजित केली आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधत यावेळी गंगा घाटावर गुढीची उभारणी करण्यात येणार आहे.18 तारखेची सुरुवात प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या सुरेल बासरी वादनाने होणार आहे. त्यानंतर मुजुमदार महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांची संस्कृती बासरी वादनातून सादर करणार आहेत. दिवंगत श्रेष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे त्यानंतर आपले गायन सादर करतील. त्यानंतर मुजुमदार आणि भाटे दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक बंध आपल्या कलेतून संगीत रसिकांसमोर उलगडतील.
वाराणसीचे आयुक्त नितीन गोकर्ण, काशी मराठी समाजाचे सुमारे 450 सदस्य, डॉ. लेनिन लघुवंशी, ‘पीपल्स व्हिजीलन्स कमिटी ऑन ह्युमन राईट्स या एनजीओ संघटनेचे सदस्य, बनारसी साडी तयार करणारे कामगार तसेच वाराणसीचे नागरीक या संगीत मैफलीचा श्रोते म्हणून आस्वाद घेणार आहेत.
माध्यमचे संस्थापक राहुल बगे म्हणाले, ‘गंगा घाटावर गुढीपाडव्याच्या निमित्त गुढी उभारण्यात येणार आहे. त्यामधून उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक बंध कितीपक्का आहे, याची जाणीव होते. वाराणसीचे आयुक्त नितीन गोकर्ण हे मूळचे मराठी असून दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत बरेच प्रयत्न केलेआहेत. गुढी उभारण्यासाठी लागणारे वस्त्र हे स्थानिक हस्त विणकरांनी तयार केले आहे. वाराणसीमधील विणकरांच्या कलेला सलाम करण्यासाठी मोठ्या संख्येने विणकरी समाज या संगीत मैफलीला उपस्थित राहणार आहे.