सोलापूर, - नीरा उजव्या कालव्यातून टेल टू हेड या नियमानुसार शेवटपर्यंत पाणी सोडण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे भाळवणी प रिसरातील शाखा दोनच्या शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, मुबलक पाणी असतानाही चुकीच्या पाणीवाटपामुळे या भागातील शेतकर्यांची पिके जळून जात होती. अधिकार्यांच्या हलगर्जीपणा व पाणी वाटपातील असमानता, अधिकार्यांकडून सल्लागार समितीला दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे 22 गावांतील शेतकर्यांवर अन्याय होत होता. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील नीरा कालवा शाखा क्रमांक दोनच्या शेतकर्यांसाठी 18 मार्च रोजी तांदूळवाडी येथे पाणी परिषद आयोजिली आहे. यात प्राधिकरणाचा निकाल, पाणीवाटप, पाणीपट्टी, वापर संस्था याची माहिती देण्यात येणार असल्याचे अॅड. नागेश काकडे यांनी सांगितले.
नीरा उजव्या कालव्यामधून शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्याचा आदेश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:47
Rating: 5