मुंबई, दि. 15, मार्च - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना पुढील उपचारांसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार आहे. जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नसल्याने त्यांना केईएम रुग्णालयाच्या हिपॅटोपॅनक्रिअॅटोबिलिअरी विभागात दाखल करण्यात येणार आहे. छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यासाठी आर्थर रोड जेल प्रशासन आणि उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसंच डॉक्टरांना अहवाल देण्याचे आदेशही डा ॅक्टरांना देण्यात आले आहेत.
भुजबळांवर केईएम रुग्णालयात उपचार होणार !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:12
Rating: 5