जोपर्यंत सत्तेत आहोत, तोपर्यंत दारुबंदी कायम राहणार - नितीश कुमार
पाटणा, दि. 30 - जोपर्यंत सत्तेत आहोत, तोपर्यंत दारुबंदी कायम राहणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात जोपर्यंत दारुबंदी आहे, तोपर्यंत दारु पिणार्यांना आणि त्याची अवैध पद्धतीने तस्करी करणार्यांची गय केली जाणार नाही. गेल्या महिन्यात एका पोलीस कर्मचार्याने जप्त केलेली दारु उंदरांनी लंपास केल्याचे वक्तव्य केले होते. त्याच्यावर फक्त देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रतिक्रिया उमटली. त्यावेळी पोलिसांनी जप्त केलेली दारु नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आणि अवैध पद्धतीने दारुची तस्करी वा उद्योग करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बिहारच्या दारु उत्पादक कंपन्यांना मुदतवाढ दिली असून आपल्याकडील साठा 31 जुलैपर्यंत काढून टाकण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले.