7 रस्त्यांच्या कामासाठी 22.50 कोटींचा निधी
दि. 9 मार्च 2018 रोजी राज्याचा सन 2018-2019 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, यावेळी आमदार राहुल जगताप यांनी श्रीगोंदा-नगर तालुक्यातील रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजूरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 5 रस्त्यांचा तर, नगर तालुक्यातील 2 अशा एकुण 7 रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून, कामांसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. हे सर्वच रस्ते तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे रस्ते आहेत. यामुळे येथील शेतकरी, नागरीक या रस्ते कामांच्या सुधारणेसाठी वारंवार मागणी केली होती. याची दखल घेत आ. राहुल जगताप यांनी सदर रस्त्यांचा समावेश अर्थसंकल्पीय निधीत करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांचा समावेश करण्यात आला आहे.