Breaking News

महिलांनी स्वतःसाठी जगायला शिकावं - मनिषा सोनमाळी

जागतिक महिला दिनानिमित्त कर्जत बाजारतळावर येथील एरोबिक्स महिला गृपतर्फे नगरसेविका मणिषा सोनमाळी यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमावेळी शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये महिलांसह विद्यार्थिनिंनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर यामध्ये विविध मनोरंजक खेळांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. होममिनिस्टरच्या या मनोरंजक स्पर्धेत काकडे कलेक्शनतर्फे पैठणीचे प्रथम पारितोषिक गीतांजली गदादे यांनी मिळविले. तर दुसरे बक्षिस अंनिस सराफ यांचे गोल्ड प्लेटेड बांगड्या टोने मॅडम यांनी जिंकल्या. तसेच तिसरे बक्षिस शिवसागर कलेक्शन तर्फे डिझायनर साडी सायंबर मॅडम यांनी पटकावली. चतुर्थ पारितोषिक परिवार एजन्सीज मार्फत दिले गेले. प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना नागेबाबा मल्टीस्टेट तर्फें पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महिलांचा आधारवड भामाबाई राऊत या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विद्या काकडे यांनी भूषविले. तर यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रतिभा भैलुमे, मोनाली तोटे, मंगल तोरडमल, राणी गदादे या नगरसेविकांबरोबरच देशमुख वाडीच्या सरपंच निर्मला मोढळे, आशा क्षिरसागर, शबाणा पठाण या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मणिषा सोनमाळी यांनी केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, महिलांनी स्वतःसाठी जगायला शिकायला हवं. स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. प्रामुख्याने महिलांनी महिलांचा सन्मान करायला हवा. त्याचबरोबर त्यांनी यावेळी जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी आभार अश्‍विनी गायकवाड यांनी मानले.