Breaking News

आदिती नरसाळेचे यश


नेवासा तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा विवेकानंदनगर शाळेची इयत्ता तिसरीची विदयार्थीनीआदिती भास्कर नरसाळे हिने राज्यस्तरीय मंथन प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. तिला 300 पैकी 284 गुण मिळाले असून तिच्या या घवघवीत यशाबददल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

पंचायतसमिती सभापती सुनिताताई गडाख, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, गट शिक्षणाधिकारी विलास साठे, केंद्रप्रमुख शाम फंड यांनी आदितीसह शाळा, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले आहे . मुख्याध्यापिका रेखा नन्नवरे , वर्गशिक्षिका शुभांगी सातपुते , संदीप गटे, कविता रोहकले यांचे मार्गदर्शन लाभले.