बारागाव नांदूर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी खतीब महंमद देशमुख
तालुक्यातील बारागाव नांदूर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी खतीब महंमद देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी हिराबाई जगन्नाथ गाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र कोहकडे होते. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून सहायक निबंधक एन. खंडेराय यांनी काम पाहिले. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाडे, वसंतराव गाडे, कैलास पवार, नवाजभाई देशमुख, रफीक ईनामदार, विश्वास पवार, जगन्नाथ गोपाळे, भास्कर गाडे, किेशोर कोहकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.