आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील - रामदास आठवले
पुणे, दि. 03, मार्च - आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले. मात्र अडीचशे जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला त्यांनी यावेळी दिला. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याचे केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
2019 च्या निवडणुकीची तयारी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागा कमी होतील, हे आम्ही मान्य करतो. गुजरातमध्ये भाजपाला 115-16 जागा मिळतील असे वाटले होते. मात्र 99 जागांवर समाधान मानाव लागले. आगामी निवडणुकीत भाजपाला अडीचशे पेक्षा जास्त जागा मिळतील. काही राज्यात फटका बसेल अनेक राज्यात भाजपाचे सरकार आलेले आहे, पण थोडा चढउतार राजकारणात असतोच असेही ते यावेळी म्हणाले.