भाजपचा ‘उपमहापौर’ निवडणुकीमधून काढता पाय
अहमदनगर/प्रतिनिधी : उमहापौरपदासाठी भाजपाला चांगले प्रायश्चित भोगावे लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुक लढवायची नाही असा पक्षादेश काढण्याची वेळ अखेर भाजपवर येवून ठेपली आहे. तर दुसरीकडे भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांनी खासदार दिलीप गांधी गटाची ही खेळी असल्याचा आरोप करत एक प्रकारे राष्ट्रवादीलाच पाठिंबा असल्याचे वक्तव्य करुन भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
दरम्यान, उपमहापौरपदासाठी सात जणांचे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून शिवसेनेच्यावतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीनेसुध्दा यामध्ये उडी घेवून ऐनवेळेला उमेदवारी करण्याचा निर्णय घेवून दिलेला शब्द पलटविल्याची चर्चा मनपा वर्तुळात जोरदार सुरु झाली आहे. 5 तारखेला होणार्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यातासुध्दा वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम याच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजपने या निवडणुकीतून सपशेल माघार घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. या दोन्ही पक्षांकडून बहुमताची आकडेमोड सुरू आहे. शिवसेनेचे वतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. यात शिवसेनेचे वतीने अनिल बोरुडे, दिपाली बारस्कर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर मुदस्सर शेख (काँग्रेस) आरीफ शेख, समद खान, विपुल शेटीया (राष्ट्रवादी), वीणा बोज्जा (मनसे)यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गुरूवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पदाधिकार्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. छिंदम याच्या वक्तव्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्याचे प्रायश्चित म्हणून उपमहापौरपदाचा उमेदवार द्यायचा नाही असा निर्णय झाला. त्या अगोदर अभय आगरकर गटाकडुन दत्तात्रय कावरे यांचे नांव निश्चित झालेले होते. त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. पण गांधी गटाने खोडा घातल्याचे बोललेे जात आहे. त्यामुळे अखेरीला उमेदवारी न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला व तो अधिकृतपणे जाहिर केला. क ोणालाही पाठींबा द्यायाचा नाही असे सांगितले. त्यामुळे भाजप आता चांगलाच अडचणीत सापडला आहे.