Breaking News

सक्षम महिला पारनेर महोत्सवाचे आयोजन


सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 30 मार्च ते 1 एप्रिल रोजी पारनेर शहरांमध्ये सक्षम महिला पारनेर येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.परंतू हा आयोजित कार्यक्रम हा सुजय विखे यांच्या वैयक्तीक असून त्यासाठी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा वापर करून खाजगी कार्यक्रमात सरकारी कार्यक्रम घेण्यास भाग पाडून त्यासाठी पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका यांचा वापर या कार्यक्रमासाठी करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गणेश शेळके यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रविवारी 31 मार्च रोजी असणारा पंचायत समिती पारनेर अंतर्गत भारत मिशन ग्रामपंचायतींना ओडीएफ प्रमाणपत्र वाटप करणे, वैयक्तीक व सार्वजनिक स्वच्छता जाणीव जागृती अभियान व किशोरवयीन मुलींचे आरोग्य मेळावा हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, हा शासकीय कार्यक्रम असून तो पंचायत समितीच्या सभागृहामध्ये किंवा मग एखादे ठिकाण ठरवून स्वतंत्ररित्या घेणे अपेक्षित असताना सभापती झावरे यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी तसेच गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सर्व यंत्रणा खासगी कार्यक्रमाला लावून त्यांना वेठीस धरले आहे. तसेच पंचायत समिती सदस्यांनादेखील याबाबत अंधारात ठेवले असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.