Breaking News

जयहरी महिला प्रतिष्ठान तर्फे महिलाचा महिलांदिनानिमित्त सन्मान:आ. मुरकुटे


भेन्डा/प्रतिनिधी /- नेवासा तालुक्यातील देवगाव येथील जयहरी महिला प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा दि ७-३-२०१८ रोजी भेंडे येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता मा. प्रतीक्षा कोरेगावकर यांचे महिला शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान आयोजीत केलेले आहे. शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांचा महिला शौर्यगाथा पोवाडा आयोजित केला आहे. तरी तालुक्यातील महिलांनी आवर्जुन उपस्थित राहावे. असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा मुरकुटे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. मंगलताई काटे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व महिलावर्गांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे