Breaking News

नैसर्गिक रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी


नेवासा/ शहर प्रतिनिधी/- नैसर्गिक रंगाची उधळण करत जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेतील मुलींसह शिक्षकांनी रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमी सणानिमित्त जिल्हा परिषदेच्या मराठी मुलींच्या शाळेमध्ये रंगपंचमी सणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत येताना मुलींनी नैसर्गिक रंग घेऊन येण्यास सांगितले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक संतोष दरवडे यांनी मुलींना नैसर्गिक रंगाचे महत्त्व आणि रासायनिक रंगाचे धोके मुलींना समजावून सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती रंजना सरोदे, शिक्षिका सुरेखा वाघमारे, वैशाली कुलट सरगैयै यांनी मार्गदर्शन करून रंगपंचमी सणाच्या मुलींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुलींनी एकमेकीना रंग लावून आनंद रंगपंचमीचा लुटला . शहरात चौका चौकात रंगपंचमी सणा निमित्त युवकांनी रंगाची उधळण करत शुभेच्छा दिल्या.