Breaking News

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट

बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा शोध घेत असलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने (एसआयटी) आरोपी के. टी. नवीन कुमार याची नार्को अ‍ॅनॅलिसिस चाचणी क रण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू युवा सेना नामक संघटनेचा कार्यकर्ता असलेल्या नवीनला 9 मार्चला आरोपी घोषित करण्यात आले होते. राज्य पोलीस दलाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने 18 फेब्रुवारीला त्याला अटक केली होती. ’लंकेश पत्रिके’ नावाची वृत्तपत्रिका चालवणार्‍या गौरी लंकेश यांची त्यांच्या येथील निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या क रण्यात आली होती. या घटनेनंतर कर्नाटकासह देशभरात विविध ठिकाणी निषेध दर्शवण्यात आला होता.