Breaking News

महिलांनी मैत्रीपूर्ण प्रतिसाद द्यावा- चैतालीताई काळे


कोपरगाव -  परस्पर प्रतिसाद देवून मैत्री वाढवावी. ही मैत्री संकटकाळात सहकार्य देणारी असावी. जेणे करून मैत्रीचा धागा पक्का होऊन सामाजिक अन्याय दूर करण्यास मदत होईल . असा दृढ विश्वास अ, नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी व्यक्त केला. त्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस व संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव मध्ये आयोजित ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोपरगाव वकील संघाच्या अध्यक्षा अॅड. पूनम गुजराथी होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पुरुषांबरोबर स्त्रियांनी आपले हक्क मिळवावे. यासाठी जनजागृतीची गरज वाटते. स्त्री ही स्त्रीची शत्रू नसून मैत्रीण आहे. तिने आपल्या मैत्रीचे जतन करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. पी. काकडे होते. त्यांनी अन्यायाची जाणीव होण्यासाठी महिलांनी निरंतर चिंतन करून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन केले. कु. सोनाली माळवदे, कु. गायत्री ठाकरे, कु. मनिषा संत इत्यादी युवतींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. कारभारी नाना आगवन, श्री. संदीप वर्पे, पंचायत समिती सभापती अनुसयाताई होन, विमलताई आगवन, सुवर्णाताई गंगुले, अंजलीताई काळे, उपप्राचार्य डॉ. बी. बी. कांदळकर, प्रा. नानासाहेब देवकर, प्रा. डॉ. राजाराम कानडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गणेश विधाटे यांनी तर आभार प्रा. सौ. चित्रा करडे यांनी मानले. सूत्रसंचालन कु. सोनाली माळवदे व कु. गायत्री ठाकरे यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनिल गोसावी, श्री. संतोष वढणे, विद्यार्थी उपस्थित होते.