जिल्हा परिषद शाळा पुढे नेऊ : रोहमारे
कोपरगाव ता. प्रतिनिधी - चिमुकल्यांच्या चेह-यावरील आनंद समाधान देणारा आहे. बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश हा मुलाचे कलागुणांना वाव देणे, मुलांच्या मध्ये आत्मविश्वास वाढवणे, गुणवत्ता वाढवणे आहे. युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा पुढे नेवून सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे यांनी केले.
चांदेकसारे जिल्हा परिषद गटाच्यावतीने अंजनापूर येथे शिक्षण विभागाचा बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाल आनंद मेळावा स्टॉलचे उदघाटन रोहमारे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन होत्या. सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांचे भाषण झाले. नानासाहेब गव्हाणे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, अरुण गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, जिजाबापू गव्हाणे, बाळासाहेब राहणे आदी यावेळी उपस्थित होते.