Breaking News

मध्य मुंबई साबांच्या चोवीस कोटी अपहाराची कुंडली चामलवारांनी केली तक्ताबंद

मुंबई/ विशेष प्रतिनिधी । मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील चोवीस कोटी अपहार प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील, त्यांचे सहकारी अभियंते आणि संबंधित कंत्राटदार यांची पोल खोलणारा तक्ताच पुरावा म्हणून सादर झाला आहे. धनंजय चामलवार यांच्या चौकशीत आढळलेल्या त्रुटींचा गोषवारा या तक्त्यात नमूद असल्याने कंत्राटदारांना जाणीवपुर्वक अतिरिक्त देयके अदा करून शासनाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान केल्याचे तक्त्यावरून प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.


कार्यकारी अभियंतां पाटीलसह सह अभियंता कंत्राटदारांनी कोट्यावधीचे नुकसान केल्याचा ठपका
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांनी आपल्या अखत्यारीतील वेगवेगळ्या उपविभागात देखभाल दुरू स्तीच्या (लेखाशिर्ष 2059) नावावर निविदा प्रक्रीये व्यतिरीक्त कामांचे अतिरिक्त देयके मंजूर करून अंदाजपत्रकीय मंजूरीपेक्षा अधिक रकमेचे धनादेश संबंधीत कंञाटदारांना अदा के ल्याची बाब मुंबई सार्वजनिक बांधकाम दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी केलेल्या सखोल चौकशीत निष्पन्न झाली. त्यानंतर चामलवार यांनी या चौक शीचा अहवाल धनंजय चामलवार यांनी सादर करतांना एक तक्ता शासनाला सादर केला आहे. या तक्त्यात कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांनी वेगवेगळ्या कामांच्या दर्जात तडजोड करून मुळ मंजूर रकमेपेक्षा अधिक रक्कम मंजूर करून त्या रकमेचे धनादेश संबंधित कंत्राटदारांना प्रदान केल्याचा लेखाजोखा मांडला आहे. ही सर्व देयके तत्कालीन कार्यक ारी अभियंता ए. जे. पाटील यांच्या स्वाक्षरीने मंजूर झाल्याचे या तक्यात नमूद आहे. पी. ए. गायकवाड, ए. के. कानीटकर, पी. व्ही. वाघ, डी. एन. पाटणकर, टी. के. सनाळक र, बि. व्ही. पाटील, प्रकाश म्हात्रे, डी. ए. व्यवहारे, एस. पी. पोळ, आर. के. पाटील, एस. के. भंदूर्गे, आर. व्ही. तळपदे, डी. एस. कुंभार, ए. डब्लू. वाघमारे आदी अ भियंत्यांनी मोजमाप पुस्तिकेत नोंद करून देयके तपासणी करण्यात मोलाचे योगदान देत कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील यांच्या चोवीस कोटी अपहारात सहभाग नोंदविल्याचेही हा तक्ता सांगतो. वीर एमएसएसएम, ओमकार एमएसएसएम, गंगा, गायत्री, नीलम, नीलकंठ, कलाभुषण, मातृभूमी, चंद्रभागा, कोहीनूर, अश्‍विनी, चंद्रमुखी, काकड इंजीनिअरींग, प्र तिक, स्वराज, सरस्वती, खंडोबा, साई स्वाती, सारथी, हायजेनिक सर्व्हीसेस, तेजस, प्रियंका अशा वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांना अतिरिक्त देयके प्रदान केल्याचे या तक्त्यात नमूद आहे. यापैकी कंत्राटदारांनी मात्र सदर काम केल्याचे दिसून येत असल्याचेही आवर्जून नमूद आहे. या अहवालावरून या तक्त्यातील माहितीप्रमाणे या संबंधितांवर वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असा आदेश अवर सचिव गो. भ. शिंदे यांनी दि. 6 फेब्रूवारी 2018 रोजी दिले होते.