Breaking News

हक्कासाठी अंगणवाडीताईंचे धरणे आंदोलन

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषदसमोर प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्षा कमलताई बांगर, जिल्हासंघटक सचिन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडीताईंनी दिलेेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला होता. अंगणवाडीताईंच्या हक्कासाठी महासंघाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सेवानिव ृत्तीचे वय 65 हे कामय ठेवण्याची मागणी याव्दारे करण्यात आली आहे. शासनाने परिपत्रक काढून अंगणवाडीताईंचे सेवानिवृत्तीचे वय 65 वरुन 60 केले आहे. याचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली असून सेवानिवृत्तीचे वय 65 कायम ठेवण्याची यामध्ये मागणी केली आहे. काल दि.12 रोजी अंगनवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने पंचायत समिती येथे धरणे आंदोनल करण्यात आले. जागतीक महिला दिनाला महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांचे सेवा निवृतीचे वय 65 वरून 60 केले. कोणत्याही संघटनेला विश्‍वासात न घेता हा तुघलकी निर्णय घण्यात आला. याचा निषेद करत राज्य भर आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या जिल्हाध्यक्षा कमल बांगर यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने पंचायत समिती बीड येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. 

हे आंदोनल प्रदेश अध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या मध्ये अंगणवाडी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे कायम ठेवावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सेवासमाप्ती लाभ मिळावा, इंधन व प्रवास भत्ता मिळावा, माजलगाव प्रकल्पातील अनागोंदी कारभाराची चौकशी करावी, निकृष्ठ प्र तिच्या टी.एच. आर बंद करुन त्याचा मोबदला पालकांना द्यावा, ऑफलाईन मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी बीड जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, जिल्हाध्यक्षा कमल बांगर, जिल्हासंघटक संचिन आंधळे राज्यसंघटक दत्ता देशमुख, रजीया दारुवाले, कौशल्या कटारे, गयाबाई सोळंके, मंगल थोरात, लता बोबडे, सत्यभामा सुपेकर, संंजिवनी डोंगर, लता चेपटे, वच्छला नाईकवाडे, शामल जोगदंड, आग्णी खळगे, शिला उजगरे, मंगल गुजर, श र्मिला ठोंबरे, रोहिनी लोमटे, निर्मला कराड, रजनी मोहड, जया चंदन, मिना कांडेकर, विमल कोरडे, महानंदा घाडगे, कांता शिंदे, गायाबाई तिडके आदि सह शेकडो महिला उपस्थिती होत्या.