Breaking News

स्पर्धा परीक्षा केंद्रांबरोबरच शासनाने नोकरभरती करावी

रत्नागिरी, दि. 19, मार्च - राज्यातील जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली, ही बाब स्वागतार्ह असून त्याची त्वरित अंमलबजावणी व्हायला हवी. मात्र केवळ स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून बेरोजगारांची फौज निर्माण करण्यापेक्षा राज्य सरकारने विविध विभागांत चार वर्षांपासूनची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी कोकण विभाग कृषी पदवीधारक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विकास धुत्रे यांनी केली आहे. 

राज्यात हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना राज्य शासनाने मागील चार वर्षांपासून गट क व ड वर्गाची पदे भरणे बंद केले आहे. यावर्षी राज्य सेवेच्या केवळ 69 जागांची जा हिरात प्रसिद्ध झाली. स्पर्धा परीक्षांच्या जागांमध्ये वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून राज्यभर मोर्चेदेखील काढण्यात आले. त्याचा असंतोष कमी करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 
राज्यात विविध विभागात एक लाख 77 हजार 259 पदे रिक्त आहेत. नोकर्यां साठी तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ही बाब लक्षात घेऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे, असे मत धुत्रे यांनी व्यक्त केले.