Breaking News

देशपातळीवर आपल्या राज्यांचा नावलौकीक व्हावा- एकनाथ पवार

पुणे, दि. 14, मार्च - आपण वेगवेगळया राज्यांतून पिंपरी-चिंचवड या नगरीला भेट देण्यासाठी आला आहात. शहरवासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपण ज्या राज्यातून आला आहात. त्या राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, देशपातळीवर आपल्या राज्यांचा नावलौकीक व्हावा. भारत देशाला समृध्द राष्ट्र करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन, मत सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले. केंद्र शासनाच्या खेल व युवक कल्याण मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवक विकास उपक्रमाअंतर्गत मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा व नागालँड या पूर्वोत्तर राज्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देण्यास आलेल्या अभ्यागत विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. 


आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर हे गेल्या 10 वर्षात झपाटयाने वाढलेले शहर आहे. या शहराचे औद्योगीकरण मोठया प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे विकासाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. या शहराच्या औद्योगिकी करणाबरोबर शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, रस्ते विकास इत्यादी पायाभूत सुविधामध्ये मोठया प्रमाणावर प्रगती झाली आहे. उपमहापौर शैलजा मोरे व नगरसदस्या अनुराधा गोरखे यांनीही अभ्यागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी केले. तर आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.