Breaking News

गुगलचे ‘डुडल’द्वारे महिलांना अभिवादन


मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने डुडलद्वारे महिलांना अभिवादन केले आहे. गुगलने आपले डुडल जगभरातील 12 नामवंत महिला आर्टिस्टना समर्पित केले आहे. डुडलवर फोटो स्लाईडद्वारे स्त्रियांची कथा मांडण्यात आली आहे. गुगलने महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलांचे आभार मानले आहेत. या 12 महिलांमध्ये अ‍ॅना हेफिस्क, चिहिरो ताकेयुची, अ‍ॅस्टली मेजा, फ्राँन्सेसका साना, इसुरी, काराबो पॉपी मोलेत्सेन, कावेरी गोपालकृष्णन, लेर्टे, फिलिपा राइस, साफा खान, टिली वाल्डेन आणि टुलिना डन यांचा समावेश आहे. गुगलने डुडलवर विविध क्षेत्रातील 12 आर्टिस्ट महिलांच्या 12 कलाकृती साकारल्या आहेत.