Breaking News

जैन सोशल फेडरेशनचा उपक्रम कौतुकास्पद ः गाडे


आनंदऋषीजी हॉस्पिटलच्यावतीने 7 ते 31 मार्च या पंधरवड्यात विविध मोफत आरोग्य शिबीरे रुग्णांसाठी घेतली जातात. रुग्णांसाठी या शिबीराचा चांगला फायदा होतो. जैन सोशल फेडरेशनचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे. जिल्ह्यातील बरेच रुग्ण या शिबीरामुळे बरे होतात. डॉ. बापूसाहेब गाडे यांनी केले. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या कार्यामुळेच सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होतो. रुग्णसेवेसाठी गरज भासल्यास जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आनंदऋषीजी हॉस्पिटलला मदत दिली जाईल असेही गाडे म्हणाले.