Breaking News

चौथ्या चारा घोटाळयात लालू प्रसाद दोषी रांचीच्या सीबीआय न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणाचा निकाल सोमवारी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयात जाहीर करण्यात आला असून या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याविषयी कुठलेही वक्तव्य करण्यास लालूंनी नकार दिला. डिसेंबर 1995 मध्ये दुमका खजिन्यातून 3.13 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप लालूंवर होता. यापूर्वीच्या तीन चारा घोटाळा प्रकरणांमध्ये लालूंना 13 वर्षे 5 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह पूर्व मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, प्रशासकीय अधिकारी व इतर असे एकूण 29 जण या प्रकरणी आरोपी आहेत. शुक्रवारी आणखी तीन सनदी अधिकार्‍यांना विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपी ठरवले.
बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन 1991 ते 1997 या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने 89.27 लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाजयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण 33 खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालूप्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या 37.5 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व 25 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. सन 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना 11 वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली.