Breaking News

नुकसान भरपाईसाठी शेतकरी औरंगाबाद खंडपीठात

प्रगतिशील शेतकरी राहुल तानाजीराव मालुसरे यांनी कपाशीवरील बोंड अळी या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील काही शेतकरी व तक्रारदार शेतकरी तानाजी मालुसरे यांनी हा नुकसान भरपाईचा दावा दाखल करताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये सन 2017/18 या खरीप हंगामात ज्या कपाशीवरील बोंड अळी या रोगामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्या शेतकर्‍यांना तातडीने अर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेवगाव येथील शेतकर्‍यांनी खंडपीठात दावा दाखल केला आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. या घोषणेला दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत कोणतीही आर्थिक भरपाई शेतकर्‍यांना मिळालेली नाही. सदर बोंड अळीमुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या कपाशीच्या शेतीचे पंचनामे कृषी विभागाने केलेले आहेत. कृषी खाते, बियाणे कंपनी, विमा कंपनी व महाराष्ट्र शासन कोणीही या झालेल्या नुकसाणीची जबाबदारी उचलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे, झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकरी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. सदर औरंगाबाद खंडपीठात तक्रारदार यांच्या वतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शेतकर्‍यांच्या वतीने अ‍ॅड. पंकज भराट यांनी न्यायमूर्तींसमोर बाजू मांडली व या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.