Breaking News

सातपूरच्या अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा


सातपूर प्रतिनिधी ;- वारंवार अनधिकृतरित्या रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी फलकबाजी करून सातपूर शहर परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर बुधवार सकाळी १ वाजता सातपूर परिसरात मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करत सातपूर परिसरातील शेकडो फलक तसेच बांधकाम तोडण्यात आले. पुन्हा फलक लावल्यास फौजदारी करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सदर मोहीम नाशिक त्र्यंबकरोड वरील सातपूर राजवाडा गावं, सातपूर बस स्टँड महिंद्रा सर्कल, परिसरात अनधिकृत दुकान व फलकावर कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या कडेला रहदारीला अडथळा ठरणारे अनधिकृत फलके,लोखंडी बोर्ड, ओटे तोडण्यात आले फलके पुन्हा लावल्यास, फौजदारी कारवाई व पाच पट दंड वसूल करण्यात येणार असल्याचा सूचना देण्यात आल्या. असून उद्याही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

या वेळी महापालिकेचे सातपूर व सिडको विभागाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण व बांधकाम कर्मचारी, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाडअतिक्रमण सहायक अधीक्षक पी.पी पगार, सचीन सणस, सातपूर पोलीस सहभागी झाले होते.