Breaking News

जलयुक्तमधील कामांमुळे 84 गावे टँकरमुक्त; पीक पध्दतीत बदल


सातारा - जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या तीन वर्षात 635 गावांची निवड करण्यात आली. सन 2015-16 मध्ये 215 गावे, सन 2016-17 मध्ये 210 गावे, सन 2017 -18 साठी 210 गावांची निवड झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे सन 2015-16 व सन 2016-17 या दोन वर्षाच्या काळात एकूण 84 गावे टँकरमुक्त झाली आहेत अशी माहिती जलयुक्त शिवार अभियान समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा कृषि अधिक्षक सुनिल बोरकर यांनी दिली.सन 2015-16 मध्ये तालुका निहाय टँकर मुक्त झालेली गावे कराड 1, वाई 3, जावली 3, कोरेगाव 9, खंडाळा 3, महाबळेश्‍वर 2, खटाव, 1 माण 4, पाटण 1 अशी एकूण 27 गावे टँकर मुक्त झाली आहेत. सन 2016-17 मध्ये कराड 1, वाई 10, जावली 4, क ोरेगाव 13, महाबळेश्‍वर 3, फलटण 2, खटाव 2, माण 17, पाटण 5 याप्रमाणे जिल्ह्यात 57 गावे टँकरमुक्त झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान या योजनेमुळे जिल्ह्यात दुष्काळ माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यासह सर्वच 11 तालुक्यामधील विहिरींच्या भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे. सन 2016-17 मध्य; वॉट कप स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून 96 गावांनी सहभाग नोंदविला होता. तर जलयुक्त शिवार योजनेसाठी 81 गावांची निवड झाली होती. भोसरे, ता. खटाव गावाचा राज्यात विभागातून दुसरा 15 लाखाचा पुरस्कार, बिदल, ता. माण गावाला राज्यात तिसरा 20 लाखाचा पुरस्कार, जळगाव, ता. कोरेगाव या गावाने सातत्यपूर्ण सहभाग घेवून कामगिरी केल्याबद्दल दुसरा 10 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. सन 2017-18 साठी वॉटर कप स्पर्धेसाठी क ोरेगाव तलुक्यातून 53, खटाव 82, माण 79 अशी 214 गावांची निवड झाली आहे. तर जलमुक्तसाठी कोरेगाव मधून 20 गावे, खटाव 26 गावे, माण 23 गावे अशी 69 गावांची निवड झाली आहे. वॉटर कप स्पर्धेसाठी यावर्षी निवड झालेल्या गावांची प्रशिक्षण (ट्रेनिंग) अंतिम टप्प्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजना सुरु झाल्यानंतर शेतक-यांनी शेतात पिक पध्दतीत बदल केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. सन 2016-17 मध्ये निर्मित कपार्टमेंट बंडींग 3668.43 टीसीएम पाणी साठ्यामुळे 3668.43 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळाला आहे.सलग समपातळी चर मध्ये 302.42 टीसीएम पाणी साठ्यामुळे 302.42 हेक्टर ओलीताखाली आले आहे. माती नाला बांधमुळे 1587.60 टीसीएम पाणीसाठा होवून 1587.60 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. खोल सलग समपातळी चर 470.96 टीसीएम पाणी साठा होवून 470.96 टीसीएम पाणी साठा होवून 470.96 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेततळे मध्ये 160.57 टीसीएम पाणी साठा होवून 160.57 हेक्टर क्षेत्रावर लाभ झाला. साखळी सिमेंट बंधा-यामुळे 3104.60 टीसीएम पाणीसाठा झाला. 3104.50 हेक्टर क्षेत्राला लाभ झाला. ओढा जोड प्रकल्पामुळे 696.50 टीसीएम पाणीसाठा होवून 696.50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गाळ काढणे 2398.55 टीसीएम पाणीसाठा होवून 2398.55 हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. के. टी. वेअरमुळे 647.50 टीसीएम पाणीसाठा झाला असून 647.50 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.पाझर तलाव दुरुस्ती 1399.90 टीसीएम पाणी साठा होवून 1399.90 हेक्टर क्षेत्रावर लाभ झाला आहे. याप्रमाणे 16950.08 टीसीएम पाण्याची निर्मिती होवून 16950.08 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. न्हावी बुद्रुक, ता. कोरेगाव येथील जलयुक्त शिवार अभियानाची पहाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 19 मे 2017 रोजी केल्यानंतर झालेल्या कामाची प्रशंसा केली होती.