Breaking News

महिलेला 8 लाख 20 हजारांना गंडा

कल्याण  - कल्याण पश्‍चिम नजीक असलेल्या आंबिवली अटाळी येथे हरीश आशिष बिल्डींगमध्ये राहणारी महिला ललिता रोकडे यांच्या ओळखीचे असलेले विजया येरूनकर, विजय येरूनकर यांनी ओळखीचा गैरफायदा घेत दोन वर्षांपूर्वी रोकडे यांच्याकडून 8 लाख 20 हजार रुपये घेतले. मात्र दोन वर्षे उलटूनही ही येरूनकर यांनी पैसे परत न दिल्याने रोकडे या येरूनकर यांच्या घरी गेल्या. 


यावेळी विजया येरूनकर, विजय येरूनकर, रोहन वेरूनकर, विजया मोरे यांनी रोकडे याना पैसे देण्यास नकार देत त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. अखेर त्रस्त झालेल्या रोकडे यांनी खडक पाडा पोलीस स्थानकात विजया येरूनकर, विजय येरूनकर, रोहन वेरूनकर, विजया मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.