Breaking News

डमी परीक्षार्थ्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी


नांदेड : डमी परीक्षार्थी प्रकरणात किनवटच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी 15 जणांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर शासकीय नोकर्‍या मिळवण्यासाठी डमी परीक्षार्थ्याला परीक्षेला बसवून सरकारी नोकर्‍या मिळवणारे रॅकेट नांदेड जिल्ह्यातील मांडवी या गावात सक्रिय आहे. बनावट पद्धतीने परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवणार्‍याविरोधात महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून कारवाई सुरू केली आहे.