Breaking News

पासपोर्ट व्हेरीफिकेशनसाठी 5 हजारांची लाच स्विकारताना पोलिस शिपाई अटकेत

मनमाड, दि. 08 मार्च - पासपोर्ट व्हेरिफिकेशन प्रकरण तयार करून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यातील शिपाई मोठाभाऊ पोपट बच्छाव यास नाशिकच्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून काही महिन्या पूर्वी लाच घेताना एका ठाणे अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले होते. या बाबत अधिक वृत्त असे की पासपोर्ट बनविण्यासाठी एक ा इसमाने अर्ज केल्या नंतर या इसमावर पोलीस स्थानकात काही गुन्हा दाखल आहे का याचे व्हेरिफिकेशन करून वरिष्ठांकडे पाठवायचे होते त्यासाठी बच्छाव यांनी सदर इसमाकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती.या इसमाने नाशिक येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्या नंतर एसीबीने सापळा रचला होता.या प्रकरणी एसीबीने बच्छाव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.