Breaking News

मालकाला 2 लाख 53 हजारांचा गंडा

डोंबिवली  - सी.ए. ला देण्यासाठी मालकाने विश्‍वासाने दिलेली 2 लाख 53 हजारांची रोकड नोकराने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात रमेश सरोज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड येथे राहणारे ऋषभ गडा याच्याकडे डोंबिवली येथे राहणारा रमेश सरोज हा काम करत होता. सोमवारी ऋषभ यानी रमेशला सी.ए. ला देण्यासाठी 2 लाख 53 हजार रुपये रोख रक्कम दिली. मात्र रमेश याने ती सी.ए. ना देता तो रोकड घेवून पळून गेला. गडा याने रमेशचे घर गाठले मात्र त्याच्या घराला कुलूप असल्याने त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रमेश सरोज विरोधात गुन्हा दाखल केला आहे.