ठाणे शहरातील 5 महिलांचा सन्मान !
ठाणे, स्त्री आज अनेक क्षेत्रात आपली क्षमता सिध्द करत असून, प्रत्येक आव्हानांना ती गवसणी घालत आहे. ठाण्यातील विविध क्षेत्रातील अशाच पाच स्त्री शक्तींचा सन्मान अरविंद पेंडसे प्रतिष्ठान आणि ऊर्जा ग्रुपतर्फे करण्यात आला. प्रत्येक स्त्री म्हणजे एक वेगळे व्यक्तीमत्व म्हणून या प्रत्येक व्यक्तीमत्वाचा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन करण्याचे यो जिले होते. अरविंद पेंडसे प्रतिष्ठान आणि ऊर्जा ग्रुप च्या संचालिका, नगरसेविका मृणाल पेंडसे व त्यांच्या सहकार्यानी या पाच प्रमुख व्यक्तीमत्वांचा प्रत्यक्ष जाऊन शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. अरविंद पेंडसे प्रतिष्ठान आणि ऊर्जा ग्रुपच्या सदस्यांनी या व्यक्तींबददल चर्चा करुन कार्याबाबत माहिती करुन घेतली.
महापौर मिनाक्षी शिंदे, ठाणे जिल्हा सहकारी अभियोक्ता माननीय ड. संगीता फड, माजी शिक्षिका आणि सरस्वती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मनिषा टिळक, वाहतुक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय कवयित्री गावित, मेंटल हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ञ डॉ.अंजली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
महापौर मिनाक्षी शिंदे यांचा सत्कार करताना त्यांची कारभार सांभाळण्याची क्षमता नक्कीच कौतुकास्पद आहे व या क्षेत्रात काम करणा-या महिलांनी त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारख आहे. ठाणे जिल्ह्याच्या सरकारी अभियोक्ता माननीय ड संगीता फड यांनी आजवर अनेक महिलांना आपल्या कौशल्याने आणि सक्षमपणे न्याय मिळवून दिला. त्यांच्या प्रगल्भ अनुभवामुळे या क्षेत्रामध्ये त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला असून ही बाब एक महिला म्हणून अभिमानास्पद आहे. माजी शिक्षिका आणि सरस्वती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त माननीय मनीषा टिळक यांचा मृदू आणि गुणी स्वभाव, उत्तम शिक्षिका व सामाजिक जाण असलेले व्यक्तीमत्व असून, निवृत्तीच्या काळात निस्वार्थीपणाने समाजसेवा करत असून त्यांचा हा आदर्श तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. ठाणे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय कवियित्री गावित या स्त्रीसाठी दुय्यम मानल्या जाणा-या क्षेत्रात आज स्त्रीचे वर्चस्व निर्माण होऊ पाहतोय ही बाब प्रत्येक स्त्रीला अभिमानकारक आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ डॉ.अंजली देशपांडे हया मनोरुग्णालयामध्ये संवेदनशील परिस्थिती असूनही तेथील वातावरण अत्यंत खेळीमळीचे आणि कौटूंबिक ठेवले असून त्यांचे सर्व श्रेय त्यांच्या कौशल्याला नक्कीच द्यावे लागेल असे या प्रसंगी संचालिका मृणाल पेंडसे यांनी सांगितले.