Breaking News

येत्या 48 तासात राज्यात उष्णतेची लाट स्कायमेट या हवामान विषयक संस्थेचा दावा

मुंबई : आज सकाळपासूनच मुंबईत कडक उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. येत्या 48 तासात मुंबईत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ’स्कायमेट’ या खासगी हवामान विषयक माहिती देणार्‍या संस्थेने वर्तवलेली शक्यता वाढत्या उन्हामुळे खरी ठरताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागातही उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. कडक उन्हासोबतच वाढत्या गर्मीमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांना पुढील दोन दिवसांत वाढत्या उन्हाचा तडाखा बसणार आहे. याशिवाय राज्यातील इतर भागांतही येत्या 48 तासांत उष्णता वाढण्याची शक्यता ’स्कायमेट’ या हवामान विषयक खासगी संस्थेने व्यक्त केली आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात तापमान वाढण्याची शक्यता असताना दुसरीकडे महाबळेश्‍वरच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.