Breaking News

मोर्चाला थांबवणे सरकारच्या आवाक्याबाहेर : अ‍ॅड. आंबेडकर


राज्य सरकारने एल्गार मोर्चावर बंदी केली असली तरी मोर्चा काढण्याचा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मोर्चाला थांबवणे सरकारच्या आवाक्याबाहेर असल्याचे त्यांनी म्हटले. संभाजी भिडे यांना अटक केली असती, तर मोर्चाची वेळच आली नसती, असे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, की एल्गार मोर्चासाठी राज्यभरातून मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. हे मोर्चेकरी मागे फिरणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मोर्चेकरी सीएसटीला सकाळी 11 वाजता जमणार आहेत. त्यानंतर मोर्चा सोमवारी सकाळी 11 वाजता निघणार आहे. उद्या काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असे सांगत त्यांनी शांततेत मोर्चा काढू देण्याचे आवाहन केले. या मोर्चात संभाजी बिग्रेड, मराठा महासंघ, धनगर टायगर फोर्स, ओबीसी, माळ, लिंगायत संघटना सहभागी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. राज्य सरकारने शेवटच्या क्षणी मोर्चावर घातलेली बंदी चुकीची आहे, अशा शब्दात आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.