350 रूपयाचे नाणे लवकरच बाजारात
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक 350 रूपयांचे नाणे लवकरच प्रकाशित करणार आहे. गुरू गोविंद सिंह महाराज यांच्या 350 प्रकाशोत्सवानिमित्ताने आरबीआय ही नाणी बाजारात आणणार आहे. हे नाणे कमी कालावधीसाठी जारी करण्यात येणार आहे. आरबीआय अशाप्रकारची नाणी काही खास निमित्तासाठीच प्रकाशित करत असते. आरबीआय च्या अधिसुचनेनुसार या नाण्याचे वजन तब्बल 34.35 ग्रामच्या आसपास असेल. 350 रूपयाच्या या नाण्यात चांदीचेप्रमाण 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल 5 टक्के, आणि झिंक 5 टक्के या मिश्रणातून या नाण्याची निर्मित्ती होणार आहे. नाण्याच्या दुसऱयाबाजुला अशोक स्तंभ असेल व त्याच्या खाली सत्यमेव जयते असे लिहिलेले असेल. याचबरोबर एका बाजुला रूपयाचे चिन्ह तर मध्यभागी 350 मुद्रीत असेल.