Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजमंदिरासाठी 30 कोटी रुपयाची तरतूद


श्रीरामपुर/ ता.प्रतिनिधी/- धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाजमंदिर उभारण्यासाठी 30 कोटी रुपयाची घोषणा केली आहे. 

खासदार डॉ. विकास महात्मे यांनी राज्याचे वित्तमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील ३५० गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह उभारण्यासाठी तसेच या गावांच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देऊन मा. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पा मध्ये 30 कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. धनगर समाज संघर्ष समितीसाठी वर्ष २०१३ पासून राज्यभर अनेक दौरे डॉ. महात्मे यांनी केले. हे दौरे करताना त्यांनी अश्या अनेक गावांना भेटी देऊन मुक्काम केला जेथे पिण्याच्या पाण्यासारख्या पायाभूत सुविधाही नाहीत. अशी जवळपास ३५० गावे अधोरेखित करून त्या गावांची यादी डॉ. महात्मे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपूर्त केली होती.