Breaking News

जिल्हा बँकेने केले 30 ट्रॅक्टरचे लिलाव; लिलावातून 79 लाख वसूल

नाशिक, दि. 19, मार्च - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून धडक वसुली सुरू असून वसुलीपोटी जप्त केलेल्या वाहन, ट्रॅक्टरचे लिलाव करण्यास सुरूवात केली. पहिल्याच दिवशी कळवण तालुक्यात जप्त केलेल्या 50 पैकी 30 ट्रॅक्टरचे लिलाव करून 79 लाखांची वसुली बँकेने केली आहे. एका शेतकर्‍यांने तर थेट कर्जाची रक्कम भरून आपले वाहन नेले. 

बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी पदभार घेतल्यानंतर वसुलीवर जोर देण्याचे धोरण ठरविले. शेतकर्‍यांकडून वसुली करण्यासाठी थेट, शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेण्याचा धडका त्यांनी लावला. त्यानुसार जिल्हाभरात अध्यक्ष आहेर यांच्यासह संचालकांनी बैठका घेऊन वसुलीपात्र शेतकर्‍यांशी संवाद साधला. यात शेतकर्‍यांना कर्ज भरण्याचे आवाहन करत असतानाच वर्षानुवर्ष थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारत जप्तीची कारवाई देखील केली. वसुलीसाठी खास महिला पथकाची नियुक्ती करून वाहन व ट्रॅक्टरची जप्ती केली. गेल्या आठवडयात एकट्या क ळवण तालुक्यात वसुलीपोटी तब्बल 50 ट्रॅक्टरची जप्ती कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर थकबाकीदारांना सात दिवसांची पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र संधी देऊनही थक बाकी न भरल्याने बँकने या जप्त केलेल्या ट्रॅक्टरांची लिलाव प्रक्रिया राबविली. या लिलावास शेतकर्‍यांना चांगला प्रतिसाद दिला. यात जप्त केलेल्या 50 पैकी 30 ट्रॅक्टरांचे लिलाव झाले. या लिलावापोटी 79 लाख रूपयांची वसुली यावेळी झाली. तर एका सभासदांने ट्रॅक्टरची जागेवरच थकबाकी भरून वाहन ताब्यात घेतले. उर्वरित ट्रॅक्टरांच्या लिलावासाठी पुन्हा लिलाव प्रक्रीया राबविली जाणार आहे. दुसर्‍या टप्यात सटाणा, नामपूर येथे जप्त केलेल्या 17 ट्रॅक्टरचे लिलाव मंगळवारी (दि.20) केले जाणार असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.