Breaking News

मच्छिमारांनी पकडले अनधिकृत मासेमारी करणारे 21 ट्रॉलर्स

सिंधुदुर्गनगरी, दि. 19, मार्च - देवबाग किनारपट्टीवर अनधिकृत मासेमारी करणा-या वेंगुर्ले व मालवणातील 21 मासेमारी ट्रॉलर्स देवबागातील स्थानिक मच्छीमारांनी पकडल्याची घटना घडली. स्था निक मच्छीमारांनी ट्रॉलर्स पकडल्यानंतर पोलीस प्रशासन व मत्स्यखात्याचे अधिकारी सायंकाळी देवबाग किनारपट्टीवर दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मत्स्य विभागाकडून संबंधित ट्रॉलर्सवरील क ागदपत्रांची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू होती.
देवबाग किनारपट्टीवर स्थानिक मच्छीमारांना सात ते आठ मासेमारी ट्रॉलर्स आढळले. त्यानंतर काही स्थानिक मच्छीमारांनी देवबाग समुद्रात जाऊन हे ट्रॉलर्स पकडले, तर उर्वरित ट्रालर्स देवबाग कि नारपट्टीवर आणले. एकूण 21 ट्रॉलर्स किनारपट्टीवर आणण्यात आले होते. देवबाग किनारपट्टीवर 21 ट्रॉलर्स मासेमारी करताना आढळल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके हे देवबागातील मच्छीमारांकडून माहिती जाणून घेत होते. यावेळी तेथे मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर, छोटू सावजी आदी उपस्थित होते. यावेळी र विकिरण तोरसकर यांनी ट्रॉलर्सवरील खलाशांकडून कोणतीही तक्रार नसताना तुम्ही स्थानिक मच्छीमारांना त्रास देऊ नका, असा पवित्रा घेतला. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी मासेमारी ट्रा ॅलर्स पकडण्याचा अधिकार मच्छीमारांना कोणी दिला, असा सवाल केला. यावेळी पोलीस निरीक्षक बोडके व तोरसकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मच्छीमार नेते छोटू सावजी यांनी मत्स्य विभागाची गस्त नसल्यानेच स्थानिक मच्छीमारांना हे काम करावे लागत असल्याचे सांगितले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर तब्बल दोन तासांनी मत्स्य व्यवसायचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रविकिरण तोरसकर, छोटू सावजी, बाबी जोगी यांनी मत्स्यविकास अधिका-यांना संबंधित ट्रॉलर्स किती वावात मासेमारी करीत होते. त्यांच्या ट्रॉलर्सवरील कागदपत्रांच्या तपासणीची मागणी केली. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कागदपत्र तपासणीचे काम सुरू होते.