Breaking News

आर्थिक घोटाळ्यांची मालिका कायम ‘इंडियन टेक्नो मॅक’ चा 2 हजार कोटींना गंडा


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचे प्रकरण ताजे असताना कर चुकवेगिरीचे नवे प्रकरण समोर आले आहे. हिमाचल प्रदेशच्या अबकारी आणि कर विभागाने ’इंडियन टेक्नो मॅक’ कंपनीविरोधात 2 हजार 157 कोटी रूपयांच्या करचोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोटाळ्याची व्याप्ती 6 हजार कोटी रूपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ’इंडियन टेक्नो मॅक’ कंपनीची स्थापना 2009ला झाली होती. बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीच्या प्रवर्तकांनी विविध बँकाना कर्ज मागणीचे प्रस्ताव सादर केले. तसेच 2009 ते 2014 या पाच वर्षांच्या काळात सरकारचा कोणताही कर भरला नाही. कंपनीने आपले सर्व व्यवहार 2014 मध्येच बंद केले आहेत. तपासादरम्यान, ब ँकेच्या प्रवर्तकांनी विविध 16 बँकांकडे कर्जाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंपनी आणि बँकेत आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी कं पनीचे चेअरमन राकेश कुमार, संचालक विनय शर्मा, रंजन मोहन, आश्‍विनी साहू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपासानंतर प्रकरण अंमलबजावणी संचलनलायाकडे हस्तांतरित केले जाईल असे तपास अधिकार्‍यांनी सांगितले.