Breaking News

दुधात भेसळ करणार्‍यांना तीन वर्षाची शिक्षा

मुंबई : दूधामध्ये भेसळ करणार्‍यांविरोधात कडक कायदा करण्यात येणार असून, दुधात भेसळ करणार्‍यांना तीन वर्ष शिक्षेची तरतूद करणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली. राज्यात भेसळयुक्त दूधाची विक्री होत असून, भेसळ रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना अमित साटम, मनिषा चौधरी, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी उपस्थित केली होती.दुधात भेसळ करणार्‍यांविरोधात तीन वर्ष शिक्षेची तरतूद क रणारा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न-औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना केली.