Breaking News

सिन्नर तालुक्यात 17 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक, दि. 12, मार्च - पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणगाव परिसरातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सिन्नर पो लिसांनी मालट्रक क्रमांक एचआर 38 एक्स 1236 ला ताब्यात घेऊन तपासणी केली असता या वाहनातून 17 लाख 70 हजार रुपयांचा वॉव कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रक रणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून अन्न व औषध विभागास पाचारण करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की. सिन्नर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणगाव परिसरात सापळा रचण्यात आला. अवैध गुटख्याची वाहतूक करणारा ट्रकवर नजर ठेऊन मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रकला ठाणगाव बस स्थानकनजीक थांबवून शिताफीने ताब्यात घेतले.
त्यानंतर तपासणी केली असता राज्यात बंदी असलेला गुटखा राज्यभरात चोरून विक्री करण्यासाठी आणलेले 49 पोते जप्त करण्यात आले असून या गुटख्याची किंमत रुपये 17 लाख 70 हजार रुपये आहे.
याप्रकरणी ट्रकचालक रज्जु कल्लु बगेल (वय-26, रा. कांधिता, जि. शिवपुरी, राज्य मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चौकशीसाठी गुटख्याचे पोते, ट्रक व चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मुद्देमालाबाबतची माहिती नाशिकमधील अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे.