Breaking News

नागेपल्ली येथील परीक्षा केंद्रावरील 12 विद्यार्थी निलंबित


गडचिरोली - अहेरी तालुक्यातील केंद्रावर बारावी परीक्षेचा आज समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असतांना उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयातील भरारी पथक प्रमुख नायब तहसीलदार डी.बी.खोत यांनी राजे धर्मराव कला महाविद्यालय नागेपल्ली येथील बारावी परीक्षा केंद्रावर धाड टाकुन 12 विद्यार्थी निलंबित केले. आज 7 मार्च रोजी समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना 12 विद्यार्थी कॉपी करतांना पकडले. पथक प्रमुख खोत यांचे सोबत पथक साहाय्यक तथा अव्वल कारकून डी.ए.कोवे, लिपीक बी.जी.अलोने होते.