पुण्यातील इंदिरा कॉलेजयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेन्टेशनमध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्र महाविद्यालायातील सुहास तोडमल आणि अक्षय यादव या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालायातील या दोन विद्यार्थ्यांनी ‘फिक्स ग्लोमेराटा’ ( उंबर) या वृक्षाची भितीनाशक चाचणी घेऊन या संदर्भातील पोस्टर सादर केले होते. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक रविंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.
‘प्रवरा’च्या विद्यार्थ्यांचे सुयश
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:17
Rating: 5