Breaking News

तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंद्रभान पेरणे


तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंद्रभान पेरणे यांची नुकतीच निवड करण्यात आली. सरपंच अनिता निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं.सदस्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीला आशा खडके, रामराव पेरणे, सूर्यभान म्हसे, आदिनाथ तनपुरे, शरद धसाळ, बापू लोखंडे, बाळासाहेब कांबळे, स्वाती धसाळ, मनिषा तिजोरे, रेखा कटारे, निर्मला धागुडे आदी सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदासाठीची सूचना ग्रामपंचायत सदस्य शरद धसाळ यांनी मांडली. मावळत्या उपसरपंच आशा खडके यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, पत्रकार विनित धसाळ, आदीनाथ तनपुरे आदींची भाषण झाली. यावेळी जालिंदर खडके, माजी सरपंच गंगाधर पेरणे, सेवा संस्थेचे सदस्य सुखदेव खाटेकर, कानिफनाथ धसाळ, गहिनीनाथ पेरणे, आदिनाथ निकम, प्रभाकर धसाळ, मच्छिंद्र चव्हाण, दादासाहेब चव्हाण, वैभव पेरणे, पांडूरंग मोरे, अमोल पेरणे, मल्हारी लोखंडे, शामराव पेरणे, मंगल जैन, अविनाश पेरणे, भाऊसाहेब गंगाधर पेरणे, ग्रामविकास अधिकारी भरत जाधव, ग्रंथपाल भाऊराव खडके, नंदू धुमाळ, नवनाथ धसाळ, राहूल साळवे, रामदास कांबळे, बाबा लबडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.