Breaking News

‘प्रवरा’ चे २८ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालाय, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयांचा एकत्रित स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण कार्यकम बुधवारी {दि.२८} रोजी आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषिभूषण बन्सी तांबे, महासंचालक सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालक, परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. जी. बी. खंडागळे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोंदकर आदी विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक्षा भिसे, ओंकार साठे, मयूरी शिंदे यांनी केले आहे.